कळंब – शहरातील प्रसिद्ध बांधकाम साहित्य व्यावसायिक दिलीप टोणगे यांचे चिरंजीव अँड.प्रफुल्ल टोणगे या युवकाच्या उत्तुंग यशाबद्दल प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था,कळंब व बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होणारा सा.साक्षी पावन ज्योत परिवाराच्या वतीने दि.२१ मे २०२५ रोजी त्यांचा संस्थाध्यक्ष तथा संपादक सुभाष द.घोडके यांच्या हस्ते विशेषांक व विरंगुळा हे पुस्तक देवून भावी वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतिश टोणगे,दिलीप टोणगे,संपादक सुभाष घोडके, प्रा.अविनाश घोडके,महादेव गुजर आदींची उपस्थिती होती. अँड.प्रफ्फुल दिलीप टोणगे हा पहिली ते दहावी प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल प्रवरानगर,अकरावी व बारावी कॉमर्स साठी मराठवाडा मित्र मंडळ पुणे तर एलएलबी साठी शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज पुणे येथे त्यांनी शिक्षण घेतले आणि प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याला शिक्षणाची खूप आवड असल्याने एल.एल.एम. साठी त्याचा नंबर राष्ट्रीय प्रतिभुती बाजार संस्थान मुंबई (इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीज ला मुंबई) येथ प्रवेश घेतला व तिथेही त्याने प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला.कॉलेज मधील कॅम्प मुलाखतीमध्ये त्याची ट्रेनिंग साठी इंडिया जुरीज लॉ फर्म दिल्ली येथे नुकतीच निवड झाली आहे. या यशाबद्दल परिसरातून अँड.प्रफुल्ल टोणगे यांचे सर्वच स्थरांतून अभिनंदन होत आहे.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर