धाराशिव ( जिमाका) – धाराशिव येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने प्रशिक्षण संस्थेची निवड केली जाणार आहे. निवडण्यात येणाऱ्या संस्थेकडून मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील गरजू तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावी म्हणून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
धाराशिव जिल्हा कार्यालयास सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता एकुण 500 प्रशिक्षणार्थीचे कौशल्य विकास उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट मुख्यालयाकडून प्राप्त झाले आहे.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील कुटुंबाची सामाजिक,आर्थिक व शैक्षणिक उन्न्ती व्हावी,त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावी म्हणून समाजातील गरुजुंना आवश्यक त्या व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध होण्याकरिता प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे.
प्रशिक्षणार्थीने निवडलेल्या प्रशिक्षणाची फी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अदा केली जाणार आहे. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधी पुर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आवश्यक त्या परीक्षेला बसविण्याची जबाबदारी संस्था चालकाची राहील.त्याशिवाय संस्थेची फी दिली जाणार नाही.प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण कालवधीनुसार टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण फी अदा करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणार्थीसाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे आहे.अर्जदार हा मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील असावा,महाराष्ट्रातील रहिवासी असावा.अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे.अर्जदाराने यापुर्वी शासनाच्या, महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे.एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल.अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल सादर करावा लागेल.
धाराशिव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात प्रशिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थींनी या कार्यालयाकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.प्रशिक्षण देऊ इच्छिणाऱ्या संस्था चालकांनी आपला प्रस्ताव 31 मे 2024 पर्यंत दोन प्रतित सादर करावेत.
धाराशिव जिल्हयातील ज्या संस्थेने कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी केलेली आहे.त्याच संस्था आपला प्रस्ताव दाखल करु शकतील.31 मे 2024 नंतर प्रस्ताव स्विकारले जाणार नाही.याची संबंधितांनी नोंद घ्यावी.असे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मण क्षीरसागर यांनी कळविले आहे.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक