February 9, 2026

राजेंद्र बिक्कड यांचे अभिष्टचिंतन

  • कळंब – बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी कळंब शहरांतून प्रकाशित होत असलेल्या सा.साक्षी पावनज्योत परिवाराच्या वतीने गणेश चित्र मंदिर रोडवरील साक्षी कोचिंग क्लासेसच्या सभागृहात दि.१९ मे २०२४ रोजी जिल्हा परिषद शाळा पाथर्डी येथील उपक्रमशिल मुख्याध्यापक मार्गदर्शक तथा बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले राजेंद्र बिक्कड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे निर्भीड अध्यक्ष व अभ्यासू लेखक सुभाष घोडके लिखित पथनाट्य व अग्रलेखांचा संग्रह असलेला “विरगुंळा” हे पुस्तक,सत्यघटनेवर आधारित असलेली “साक्षी”ही कादंबरी व सा.साक्षी पावनज्योतचा विशेषांक ह.भ.प महादेव आडसुळ महाराज यांच्या हस्ते देण्यात आले.
    याप्रसंगी धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे,सहशिक्षक पवार,सा.साक्षी पावनज्योत संपादक सुभाष घोडके व प्रा.अविनाश घोडके यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!