August 9, 2025

भव्य श्रामनेर दीक्षा समारंभ शिबिरास प्रारंभ

  • लातूर (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा )- दहा दिवसीय भव्य श्रामनेर संस्कार प्रशिक्षण शिबिर
    पु. भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांचे मार्गदर्शन आणि भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या संयोजनाखाली बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व सर्व लातूरकरांच्या सौजन्याने दहा दिवसीय श्रामनेर संस्कार प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. या श्रामनेर पब्बजा संस्कार शिबीराचा भव्य दिक्षा समारंभ राजा शुद्धोधन बुद्ध विहारात संपन्न झाला. या संस्कार शिबिरामध्ये १०० जणांनी दिक्षा घेतली. यावेळी भिक्खू पय्यानंद थेरो बोलताना म्हणाले की, बौद्ध धम्माचा अभ्यास, चिंतन, नैतिक संस्कार, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, धम्मासाठी जबाबदार, कर्तव्यशील, उपासक आणि दायक घडविणे, तरुण वर्गाला धम्माप्रती आवड, श्रद्धा व निष्ठा निर्माण करणे, युवा वर्ग व्यसनमुक्त करणे याकरिता समाजात वेळोवेळी श्रामनेर पब्बजा संस्कार प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे आवश्यक आहे. हा उद्देश ठेवून बुद्ध जयंतीच्या निमित्ताने लातूर शहरा दि. १३ मे ते २३ मे २०२४ पर्यंत १० दिवसीय श्रामनेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर संपूर्ण शहर व ग्रामीण भागात फिरणार असून त्यात प्रामुख्याने बालाजी नगर, प्रबुद्ध नगर, लूंबिनी नगर, इंदिरा नगर, लेबर कॉलनी, संजय नगर, आनंद नगर, प्रकाश नगर, सिद्धार्थ सोसायटी, नालंदा सोसायटी, बौद्ध नगर, राजे शिवाजी नगर, विकास नगर आदी भागात हे शिबीर चारिका करणार आहे.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, आनंद सोनवणे, गौतम सूर्यवंशी, सूर्यकांत दांडे, विक्रम चिकाटे, वसंत वाघमारे, हेमंत जाधव, विशाल कांबळे, राजा शुद्धोधन बुद्ध विहाराचे सर्व विश्वस्त मंडळ, विनोद कोल्हे, उदय सोनवणे, अनिरुद्ध बनसोडे, भगवान नरवाडे, नागेश अहिरे, अविनाश आदमाने, पांडुरंग अंबुलगेकर, मिलिंद धावारे व महाबुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रम सुकाणू समितीच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.
error: Content is protected !!