धाराशिव (नेताजी जवीर) – उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांचा बेस्ट ऑफ चेअरमन पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धाराशिव येथे जनता बँकेच्या मुख्य सभागृहात शनिवारी ( दि.११) हा सत्कार सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील अग्रनामांकित, नावलौकिक प्राप्त उस्मानाबाद जनता सहकारी बँकचे चेअरमन वसंतराव नागदे यांना सन २०२४ चा ‘बेस्ट ऑफ चेअरमन’ हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. पुणे येथे ऑल इंडिया बँकर्स असोसिएशन यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. या बहुमानाबद्दल जनता बँकेचे चेअरमन श्री नागदे यांचा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री रणदिवे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन व पेढे भरवून सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके, व्यवस्थापक एम.बीग़ायकवाड, मुख्य अधिकारी सुनिल शिंदे, शिवाजी बुदरूटे, पांडुरंग बनसोडे, श्रीकांत शिंदे, शाखाधिकारी डी.व्ही. शेंडगे (धाराशिव), व्ही.एस. माळी ( उमरगा), टी. के. भंडारे (तुळजापूर), आर. एम. बिराजदार (औराद श.), एल.के. जाधव (उदगीर), एम.बी. गिरी (लातूर गं. गो.), एस.एस. स्वामी (कळंब), बी.एम. सुर्यवंशी (अहमदपूर), आर.जी.पवार (औसा), डी.व्ही. मुंडे (नळदुर्ग), डी.एन. पवार (भूम), डी.बी. पाटील (वाशी), ए.व्ही. शिंदे (बार्शी), एस.पी. शिवलकर (वैराग), एस.एन. पांडे (परंडा), एस.एम. दुरूगकर (रेणापूर), एस.बी. साळुंके (मुरूम), एस.एन. शिंदे (निलंगा), बी.यू. सूर्यवंशी (किल्लारी), आर.एम. बिराजदार (मुरूड), आर.एन. शिंदे (बीड), ए.टी. कौडगिरे (लातूर शि.चौ.),एस.एल. अंचुळे (सोलापूर द.चौ.), पी.आर. माने (पंढरपूर), पी.एस. गरड (परळी वै.), ए.वाय. जाधव (बसवकल्याण), पी.व्ही. जाधव (अंबाजोगाई), डी.जी. अंचुळे (चाकूर), एन.आर.मरगने (बिदर), एस.एन. ऐनापूरे (सोलापूर चाग़.) यांच्यासह महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील ३० शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी