कळंब (विशाल पवार ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक विलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विद्याभवन हायस्कूल येथील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षा २०२३-२०२४ मध्ये घवघवित यश संपादन केले आहे.
विद्याभवन हायस्कूल येथील इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२३-२०२४ मध्ये विद्यालयातील ३६ विद्यार्थी घवघवीत गुण मिळवून पात्र झाले. सर्व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थांचे शाळेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर,संस्थेचे सर्व पदाधिकारी,शाळेचे मुख्याध्यापक पवार व्ही.एस,पर्यवेक्षक. खामकर डी.टी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कडून सर्व विद्यार्थांचे कौतुक व हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात