कळंब (महेश फाटक ) – महाराष्ट्र लोकविकास मंच तथा भारत जोडो अभियानाचे मराठवाडा समन्वयक विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांनी आपली मुलगी डॉ.हर्षदाचे लग्न इंजि.अक्षय पटकुरे यांच्याशी दिनांक २ मे २०२४ रोजी पर्याय संस्थेच्या प्रांगणात सर्व धर्म सन्मान विवाह सोहळा आयोजित केला आहे. सर्व धर्म समभाव ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी परिवर्तनाची नांदी ठरणारा ऐतिहासिक अशा ह्या लग्न सोहळ्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी अण्णांच्या संकल्पनेस परवानगी दिली म्हणून संपादक सुभाष घोडके परिवाराच्या वतीने ह.भ.प महादेव महाराज आडसूळ यांच्या हस्ते हळदी कार्यक्रम स्थळांवर दि.१ मे २०२४ रोजी सायंकाळी ८.०० वाजता विश्वनाथ अण्णांचे आई वडील सौ.रुक्मिणी शिवमूर्ती तोडकर, पत्नी अनिता तोडकर,मुलगी तेजस्वी भालेराव आणि मुलगा ऋषिकेश यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संपादक सुभाष द. घोडके,कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके,सौ.रंजना सुभाष घोडके,सौ.पल्लवी सागर घोडके,भूमीपुत्र वाघ आणि नव वधू वर डॉ.हर्षदा व इंजि.अक्षय पटकुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी