August 9, 2025

महाविद्यालयीन संस्कारातूनच विधायक सामाजिक संस्कृती निर्माण होते – उपप्राचार्य प्रा.संजय पवार .

  • लातूर – शाळा आणि महाविद्यालयातून शैक्षणिक ज्ञानासोबतच संस्काराच्या माध्यमातून विधायक सांस्कृती निर्माण होऊन विद्यार्थी गुणवंत आणि गुणवान बनतात असे प्रतिपादन उपप्राचार्य प्रा. संजय पवार यांनी केले.
    महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील पीसीबी आणि पीसीएम ग्रुपच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई हे होते तर विचारमंचावर उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, सीईटी सेल प्रमुख प्रा. नितीन वाणी, प्रा. केशव सूर्यवंशी आणि रत्नेश्वर स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
    पुढे बोलताना उपप्राचार्य प्रा. संजय पवार म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात विज्ञान शाखेला एकूण ४६० विद्यार्थी प्रवेशित झाले असून यापैकी ७० विद्यार्थ्यांनी पीसीबी आणि पीसीएमकरिता ऑनलाइन सीबीटी सराव परीक्षेसाठी नाव नोंदणी केली होती. त्या दृष्टिकोनातून विविध चाचण्या आणि सराव परीक्षेच्या माध्यमातून सीईटी, नीट, जेईई, आणि तत्सम विविध स्पर्धा परीक्षा संबंधी तज्ञ शिक्षकाद्वारे गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले गेले आहे.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. नितीन वाणी म्हणाले की, सीईटी, नीट, जेईई, आणि तत्सम स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नामांकित अशा विविध इंजिनिअरिंग आणि मेडिकल महाविद्यालयात प्रवेश मिळतो. या परीक्षेला सामोरे जात असताना आपण त्याची शैक्षणिक ज्ञानासोबत मानसिक तयारी सुद्धा करणे अत्यंत आवश्यक आहे असे सांगून त्यांनी महाविद्यालयामार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांची सविस्तर माहिती देऊन पुढील सर्व परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
    यावेळी पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे आणि प्रा. संगमेश्वर पानगावे यांनीही आपापली मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
    यावेळी सय्यद जुनेद, अरब बुशरा, हिना अलमले, प्रतीक्षा भोसले, ऋतुजा साळुंखे, नितेश गर्जे, इरफान शेख, सुमित बाबर यांनी आपापली मनोगते व्यक्त करून प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपल्या मित्र-मैत्रिणीचे आभार मानले.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. केशव सूर्यवंशी यांनी मानले.
    या कार्यक्रमाला विज्ञान शाखेतील प्रा. श्रीकांत माळी, प्रा. एम. बी. बोळगावे, प्रा. आनंद खरपडे, प्रा. जयश्री पाटील, प्रा. एस एस पाटील, प्रा. रोहिणी शेटकार, प्रा. सुप्रिया बिराजदार, प्रा. संपदा लखादिवे यांची उपस्थिती होती.
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम बिराजदार, रंगनाथ लांडगे, रघु शिंदे, जगन्नाथ येचेवाड, संजय सोनवणे, दत्ता पांचाळ यांनी परिश्रम घेतले.
    या कार्यक्रमाला विज्ञान शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!