August 9, 2025

१४ ऑक्टोबरच्या आंदोलनात सहभागी व्हा – मनोज जरांगे पाटील

  • कळंब – सरकारच्या म्हणण्यानुसार ३० नाही तर ४० दिवस दिले असून अंतिमतःमराठा समाजाला सरकारने अंतिम दिवशी आरक्षण जाहीर करावे व आपल्या संविधानिक न्याय हक्काच्या मागणीसाठी मराठा समाजाने आपल्या भावी पिढीसाठी फक्त एक दिवसाचे काम बुडवून दि.१४ तारखेस अंतरवाली सराटा येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
    मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अंतरवालीसारख्या गावात येण्यासाठी भाग पाडणारे मनोज जरांगे पाटील दि.४ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री १० वाजता कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात
    संवाद यात्रेत बोलत होते.
    पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की,
    मराठा बांधवांने आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही.कुठलाही अनुचित प्रकार,जाळपोळ न करता आपणास आरक्षण मिळवायचे आहे.
    तालुक्यातील शिराढोण,कळंब, देवळाली,दहिफळ, येरमाळा आदी गावांमध्ये त्यांनी मराठा समाज बांधवाशी संवाद साधला. त्यांचे जागोजागी फुलांचा वर्षाव करत जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच, असा शब्द दिला.
    त्यानंतर दि.५ ऑक्टोबर रोजी सकाळी धाराशिव येथे ९ वाजता तर दुपारी तुळजापुरात समाज बांधवाशी संवाद साधणार आहेत तर कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन ते सोलापूरला रवाना होणार आहेत.

error: Content is protected !!