August 9, 2025

साहित्यिकांच्या सहवासामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते – प्राचार्य प्रशांत घार

  • लातूर (दिलीप आदमाने) – साहित्यिकांचा सहवास हा प्रेरणादायी असतो तसेच त्यांचे विचार ऐकून आपणालाही सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते व आपले वैचारिक भरणपोषणही होते असे मत प्राचार्य प्रशांत घार यांनी व्यक्त केले.
    शब्दपंढरी प्रतिष्ठान व जयकांती महाविद्यालय यांच्या वतीने दि.१५ एप्रिल २०२४ रोजी आयोजित कविसंमेलनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. साहित्यिकाने निर्भीड होऊन समाजास दिशा देणारी साहित्यनिर्मिती केली पाहिजे असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.श्रीधर कोल्हे यांनी केले.
    कवितेमुळे आपले जगणे सुंदर होते असे मत अध्यक्ष फ.म.शहाजिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित कविंनी रोजच्या जगण्यातील अनेक विषयांवर आपल्या कवितेतून प्रकाश टाकला. उपस्थित कविंनी पर्यावरण संवर्धन, पाऊस, शेती, पीकपाणी, कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, महिला संरक्षण अशा विविध विषयावर बहारदार कवितांचे सादरीकरण केले.
    कविसंमेलनास डॉ.धीरजकुमार कोतमे,डॉ.दिलीपकुमार गुंजरगे, डॉ.केशव अलगुले व शब्दपंढरी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य तसेच लातूर व परिसरातील अनेक कवी,कवयित्री उपस्थित होते.
    कविसंमेलनाचे सूत्रसंचलन दयानंद बिराजदार यांनी केले.
    कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमित भालके,इब्राहिम सय्यद, रामदास जाधव, मयूर आवळे यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!