August 9, 2025

जि.प.प्रशाला इटकूर एन.एम.एम.एस परीक्षेत धाराशिव जिल्ह्यात अव्वल

  • कळंब (अमोल रणदिवे) – राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती अर्थात एन.एम.एम.एस. परीक्षा ही इयत्ता 8 वी वर्गासाठी दरवर्षी घेण्यात येते. या परीक्षेतून शिष्यवृत्ती धारक होणाऱ्या विद्यार्थ्यास केंद्र शासनाकडून प्रति वर्ष 12000 रु प्रमाणे सलग 5 वर्षे एकूण 60000 रु इतकी शिष्यवृत्ती देण्यात येते. त्याच प्रमाणे या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सारथी या संस्थेमार्फत प्रति वर्ष ₹ 10000 प्रमाणे सलग 4 वर्षे एकूण 40000 इतकी शिष्यवृत्ती मिळते. धाराशिव जिल्ह्यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यातून एकूण 200 विद्यार्थी निवडले जातात. इटकूर प्रशालेचे या वर्षी 39 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी एकूण 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि त्यातील एकूण 17 विद्यार्थ्यांनी एकूण ₹ 8,40,000 एवढी भव्य रक्कम शिष्यवृत्ती स्वरूपात कमावली आहे. त्यापैकी 8 विद्यार्थी हे राष्ट्रीय शिष्यवृत्ती धारक आहेत तर 9 विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती मिळणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय शिष्यवृत्ती धारक होणारे विद्यार्थी असणारी इटकूर प्रशाला ही धाराशिव जिल्ह्यातील एकमेव प्रशाला असून हा जिल्ह्यातील सर्वोच्च निकाल ठरला आहे. या विद्यार्थ्यांना नाझरीन काझी, अनिल क्षिरसागर, अंजली यादव यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, शिक्षणाधिकारी अशोक पाटील, गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते, विस्तार अधिकारी सुशील फुलारी, केंद्रप्रमुख पांडुरंग गामोड, मुख्याध्यापक तुकाराम गरूडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिदास पावले व सर्व इटकूर अशा सर्व स्तरातून प्रशालेचे अभिनंदन होत आहे.
error: Content is protected !!