August 9, 2025

जैन समाजाच्या वतीने भगवान पार्श्वनाथची पालखी मिरवणूक

  • कळंब – दिगंबर सैतवाळ जैन समाजाच्या वतीने रविवारी कथले चौकातील भगवान पार्श्वनाथ मंदिर पासून भगवान पार्श्वनाथाची पालखी मिरवणुक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीतुन जगा आणि जगु द्या असा संदेश देण्यात आला व पर्युषण पर्वाची सांगता या पालखी मिरवणुकीने करण्यात आली. या वर्षी 18 सप्टेंबर पासुन ते 28 सप्टेंबर पर्यंत जैन मंदिरात पर्युषण पर्व संपन्न झाले. या काळात पूजा, अभिषेक,आरती व प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते तसेच या पर्व दरम्यान धर्मप्रेमी जयश्री सुभाष संगवे यांनी दहा दिवस मौनव्रत पालन केले.त्यानिमित्ताने मंदिर समितीकडून सत्कार करण्यात तसेच कळंब येथील पण सध्या पुणे येथे स्थायिक असलेले उद्योजक अरूण कंगळे यांनी दरवर्षी महावीर जयंतीला महाप्रसाद देण्याचे जाहीर केल्याबद्दल मंदिर समितीकडून सत्कार करण्यात आला.
    रविवारी शहरातून भगवान पार्श्वनाथची पालकी मिरवणूक काढून या पर्वाची सांगता करण्यात आली. मिरवणुकीमध्ये समाजातील युवक, युवती, महिला, पुरुष, लहान मुले सहभागी झाली होती. या वेळी वर्षभरात कळत-नकळत झालेल्या चुकांन बद्दल परस्परांची क्षमा मागून क्षमापना दिन साजरा करण्यात आला.
    हा सण साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आत्म्याची शुद्धी करून योग्य उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करणे हा आहे. पर्यावरणाप्रती आत्मा तटस्थ केल्याशिवाय शुद्धी होत नाही. यासाठी ‘कल्पसूत्र’ या तत्वार्थ सूत्राचे वाचन आणि विवेचन यामध्ये केले जाते. संत-मुनी आणि विद्वानांच्या सानिध्यात स्वाध्याय केला जातो. पूजा-अर्चना, आरती, त्याग, तपस्या आणि उपवास करून अधिकाधिक वेळ संताच्या सानिध्यात घालविला जातो. शिवाय आपल्या दैनंदिन कामकाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न या दरम्यान केला जातो. संयम आणि विवेकाचा अभ्यास या पर्वात केला जातो.
    असा हा पर्युषण पर्व कळंब शहरा मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलं.
    या वेळी कळंब शहरातील सन्मती जैन युवा मंच, युवक मंडळ व सन्मती महिला मंडळाने सहभाग नोंदवला.
    अशी माहिती दिगंबर जैन मंदिर चे अध्यक्ष हर्षद अंबुरे यांनी दिली.या वेळी मंदिरचे उपाध्यक्ष रमेश साखरे,सचिव दिपक मांडवकर कार्यकारणी अनिल नाकील,सचिन झांबरे,शुभम संगवे,संतोष एखंडे,नितीन साखरे, प्रकाश मांडवकर,प्रशांत संगवे,अमीत साखरे, महावीर एखंडे, लक्ष्मीकांत रामढवे,राजाभाऊ मांडवकर,महावीर संगवे पंडितजी, अनिल अंबुरे, प्रदीप संगवे, अभयकुमार मांडवकर, मिथून साखरे, विनायक रामढवे, अमोल बाभळे,श्रीअंश पांगळ, सुनील नाकील,सौ.किर्ती हर्षद अंबुरे (मा.नगरसेविका), सुजाता संगवे सन्मती महिला मंडळ अध्यक्ष, मनिषा मांडवकर, अंजली साखरे, सुचिता मांडवकर, सविता साखरे,पद्मा रामढवे, प्रफुल्ल संगवे श्रावक श्राविका उपस्थित होते.
error: Content is protected !!