धाराशिव (जिमाका) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या अनुषंगाने 40 -उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत मतदान करतांना मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहे.असे ओळखपत्र मतदाराजवळ नसल्यास मतदाराची ओळख पटविण्यासाठी मतदारांकडे आधारकार्ड,मनरेगा जॉबकार्ड,बँकांचे/टपाल कार्यालयाचे छायाचित्र असलेले पासबुक,कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड,वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स), पॅनकार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट),छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज,राज्य/केंद्र शासन,सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले छायाचित्रासह सेवा ओळखपत्र, खासदार,आमदार यांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र यापैकी कोणताही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक राहणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी कळविले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी