कळंब (अरविंद शिंदे ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक म्हणून ३३ वर्षे प्रदीर्घ अशी सेवा केल्यानंतर दि.३० मार्च २०२३ रोजी हे आपल्या सेवेतून सेवानिवृत्त झाले. याप्रसंगी ज्ञान प्रसारक मंडळ सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, प्रा. अंजली मोहेकर, प्राचार्य डॉ.सुनील पवार,प्रा.जनक टेकाळे उपस्थित होते. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांच्या या सेवानिवृत्तीनिमित्त कार्यक्रमांमध्ये त्यांच्याबद्दल मराठी विभाग प्रमुख डॉ.दादाराव गुंडरे,डॉ.सुहास निकम,डॉ.दत्ता साकोळे,प्रा.नवनाथ झाडके,प्रा. प्रणिता खोसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुशील शेळके यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.जे.एच.काझी यांनी केले. प्रा.ज्ञानेश चिंते, सुशील जमाले,प्रा.दीपक सूर्यवंशी,प्रा.डॉ.ईश्वर राठोड, प्रा.डॉ.एन.जी.साठे, डॉ.जयवंत ढोले आदी उपस्थित होते.यावेळी महाविद्यालयातील नातेवाईक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन