March 26, 2026

जवाहर नवोदय परीक्षेत विद्याभवनचा ‘ ध्रुव डिकले ‘ चमकला !

  • कळंब (विशाल पवार) – जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा २०२३- २०२४ ही संपूर्ण महाराष्ट्रात घेतली जाणारी परीक्षा असून यामध्ये शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक विलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल कळंब चा ‘ ध्रुव श्रीकांत डिकले ‘ गुणी विद्यार्थ्यांने अत्यंत कठोर परिश्रम घेऊन शहरी कोट्यामधून जवाहर नवोदय परीक्षेत घवघवीत यश संपादित केले.
    त्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक विलास पवार यांच्या ध्रुव डिकले चा यथोचित सत्कार करून त्यास भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
    याप्रसंगी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक विक्रम मयाचारी,विजय ढोले,सतीश कानगुडे,सतीश पवार व प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!