कळंब – ज्येष्ठ नागरिक हे घराची शोभा वाढवतात, हेच नवीन पिढीला संस्कार देवू शकतात, त्या मुळे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणूनच ज्येष्ठ नागरिक दिन व गांधी जयंती या निमित्ताने निराधार गावकरी अन्नछत्रालय तांदुळवाडी ता.कळंब जि.धाराशिव या ठिकाणी इनरव्हिल क्लब ऑफ कळंबच्या वतीने, ज्येष्ठ नागरिकांना अन्नदान करून,त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून,बेचाळीस जणांची मोफत वैद्यकीय तपासणी डॉ.आकांक्षा पाटील यांनी केली. या वेळी त्यांचा फुल देऊन ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा हि दिल्या. या कार्यक्रमाच्या प्रोजेक्ट चेअरमन सौ.संगिता संजय घुले या होत्या.त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा डॉ.आकांक्षा पाटील ,डॉ.मिनाक्षी भवर(शिंदे), सौ.प्रतिभा भवर (गांगर्डे),सौ.निता देवडा,सौ.राजेश्री देशमुख यांच्या सह क्लब चे सदस्य, गावकरी महीला,ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले