August 9, 2025

बसवेश्वर महाविद्यालयात विधायक माणूस घडतो – राहुल भालेराव

  • लातूर (दिलीप आदमाने ) – महात्मा बसवेश्वर महाविद्यालय हे शिक्षण, क्रीडा, समाजकार्य, राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबत विधायक माणूस घडविण्याचे कार्य करते. या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार प्रसिद्ध हास्य कलावंत राहुल भालेराव यांनी केले.
    महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात सांस्कृतिक सभागृहामध्ये शिव-बसव वार्षिक स्नेहसंमेलन २०२४चे उद्घाटन करताना ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई हे होते तर विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, विद्यार्थी परिषदेचे प्रभारी डॉ. कॅप्टन बाळासाहेब गोडबोले, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर बेडगे आणि कार्यालयीन प्रमुख नामदेव बेंदरगे यांची उपस्थिती होती.
    दि.३१ मार्च २०२४ रोजी कार्यक्रमाच्या प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहाराने अभिवादन करून दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
    त्यानंतर संगीत विभागाचे प्रा. विजयकुमार धायगुडे, प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा.गोविंद पवार, प्रा. सरस्वती बोरगावकर आणि विद्यार्थिनींनी शारदास्तवन आणि महाराष्ट्र गीत सादर केले
    पुढे बोलताना राहुल भालेराव म्हणाले की, आजच्या आधुनिक आणि धकाधकीचे जीवनात विनोदापासून दूर झालेल्या जन समुदायाला माझ्यासारखे असंख्य हास्य कलावंत जीवनाच्या आनंदी प्रवाहात आणण्याचा बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे त्यांना आपण प्रोत्साहित करत आहात त्यामुळे आज मला मनस्वी आनंद झाला असल्याचे त्यांनी सांगून विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक विकासासोबत सांस्कृतिक आणि सामाजिक विकासही साध्य केला पाहिजे असेही ते म्हणाले.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी संसद प्रभारी प्रा.डॉ. बाळासाहेब गोडबोले यांनी केले. स्वागतपर मनोगत उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे यांनी व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. नेहा कांबळे यांनी करून दिला आणि अध्यक्षीय समारोप प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी केला.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी फरकांडे, कु. ऋतुजा भिसे, कु. धनश्री भंडे यांनी केले तर आभार समाजकार्य विभाग प्रमुख डॉ. दिनेश मौने यांनी मानले.
    या कार्यक्रमाला वरिष्ठ महाविद्यालयातील संयोजन समिती समन्वयक, सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!