August 9, 2025

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बिरासा उबाळे याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने विद्याभवन हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही,एस,पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील इयत्ता ६ वी क मधील विद्यार्थी बिरसा अमोल उबाळे याची राज्य स्तरीय हॉलिबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल त्याचे अभिनंदन ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,अध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल मुख्याध्यापक पवार व्ही.एस, उपमुख्याध्यापिका पाटील एस.डी, दिगंबर खामकर आदींनी केले आहे. त्याबद्दल नुकताच प्रशालेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सदरील विद्यार्थ्याला क्रीडा विभाग प्रमुख कानगुडे एस.सी व विजयकुमार ढोले, सुरज मडके यांचे मार्गदर्शन लाभले.
error: Content is protected !!