August 9, 2025

तरूणांनो आईवडीलांच्या स्वप्नांचा पाठलाग करा – महादेव खराटे

रेणुका फाऊंडेशनचा लॅमप लाईटींग सोहळा संपन्न

  • कळंब (अविनाश घोडके) – तरुणांनो ग्रामीण भागातील पालक हे काबाडकष्ट करून ही वेळ आमच्या मुलांवर येऊ नये म्हणून तुम्हाला उच्च शिक्षण देतात तर तुम्ही शिक्षण घेत असताना त्या कष्ट करणाऱ्या आई वडीलांच्या स्वप्नांचा पाठलाग केलात तरच तुमचे आणि आईवडीलांचे जिवन सार्थकी लागले असे म्हणता येईल असे उदगार प्रसिद्ध व्याख्याते महादेव खराटे यांनी शहरातील रेणुका फाऊंडेशनच्या अंतर्गत असणार्या जे एन एम या कोर्सच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्याच्या शपथविधी व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात काढले.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रजवलन करण्यात आले.
    यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शरद जाधवर, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड,  लालालसाहेब बोंदर, पुण्यश्लोक अहिल्यानगरचे तुकाराम शिंगटे , डॉ वेदिका जाधवर, प्राचार्या राणी जाधवर उपस्थित होते.
  • पुढे बोलताना खराटे म्हणाले की तरुणपणातच आपण जिवनाला दिशा देऊ शकतो यामुळे या वयात प्रचंड मेहनत करणे आवश्यक आहे. तुमचे भविष्य हे तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे त्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास वाढवून कामाला लागा यश तुमच्याच हातात आहे.
    यावेळी कॉलेज च्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनी मेणबत्ती लावून आरोग्य क्षेत्रात भविष्यात काम करताना निःपक्षपाती पणे व सेवाभावी वृत्तीने करण्याची शपथ घेतली.
    तसेच कोरोना काळात सिस्टर्स नी कशी सेवा केली याचे नाटक सादर केले. तसेच रेणुका फाऊंडेशनच्या अंतर्गत चालणाऱ्या विविध कोर्स मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाग्यश्री कोथळे यांनी केले तर सुत्रसंचालन सरीता शिंदे व उत्कर्षां बिक्कड यांनी केले तर आभार अरूण काटे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!