लातूर (दिलीप आदमाने )- महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी अत्यंत मानाचा समजला जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 20 समाजसेवकांना नेताजी सुभाषचंद्र बोस जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यात इंजि.शालीनीताई कोकाटे यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी जि.प.लातूर यांच्या शुभहस्ते देण्यात आला. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अली सौदागर,ऊषाताई धावारे,चंद्रकांत वायाळ,सुभाष घोडके,सुफी सय्यद शमशोद्दीन, खाँजा सय्यद, हनमंत कांबळे, जेष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज आडसुळ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. यानिमित्ताने पुरस्कार प्राप्त शालिनीताई कोकाटे यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे