पिंपळगाव (डो)(राजेंद्र बारगुले ) –सत्कर्मासाठी आपल्या आयुष्यातील क्षणाक्षणांचा उपभोग घ्यावा असे मंजूळवाणीतून वारकरी संत साहित्य परिषदेच्या धाराशिव महिला जिल्हाध्यक्षा ह.भ.प.सौ. सुनीतादेवी आडसूळ महाराज यांनी पिंपळगाव (डोळा) येथील अखंड हरिनाम सप्ताहच्या तीसरे किर्तनरुपी पुष्प गुंफताना अवाहन केले. दिनांक ०५ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ९.०० वाजता सप्ताहच्या तिसऱ्या दिवशी जगदगुरू संत तुकाराम यांच्या “क्षण क्षणा हा ची करावा विचार ! तरावया पार भव सिंधू !! नाशिवंत देह जाणार सकळ! आयुष्य खातो काळ सावधान!! संत समागमी धरावी आवडी! करावी तातडी परमार्थाची !! तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नाकाडोळे धुरे भरूनी ह्या अभंगाचे विश्लेषण करतानी ह.भ. प.सुनितादेवी आडसूळ यांनी ग्रामीण भागातील महिलांना समजेल अशा शिवराळ भाषेतून अनेक उदाहरणे देऊन आपल्या मंजूळ वाणीचे दर्शन घडवले. श्री संतयोगी साधुबुवा महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त श्री संतयोगी साधुबुवा महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र पिंपळगाव (डोळा) ता. कळंब येथे अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व संजीवन समाधी सोहळा दिनांक २ मार्च ते ९ मार्च २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहातील तिसऱ्या दिवशी कीर्तन व सायंकाळचे भोजनदान पत्रकार सुभाष घोडके यांनी त्यांचे आई बगडाबाई व वडील दशरथ घोडके यांच्या स्मरणार्थ आयोजित केले होते. या प्रसंगी भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्रा.श्रीकांत पवार, प्रा.अविनाश घोडके,नामदेव पवार,पत्रकार परमेश्वर खडबडे, महेश फाटक,एसटी महिला कं.माळी, माजी चेअरमन सतीश टेकाळे,माजी सरपंच सुखदेव टेकाळे,मंदिर ट्रस्ट अध्यक्ष नारायण दशवंत आदींची उपस्थिती होती. यावेळी राजाभाऊ दशवंत,सागर घोडके,निलेश जमाले आदींनी परिश्रम घेतले.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड