कळंब – साक्षी पावन ज्योत परिवार व प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेने माझ्या वाढदिवसाच्यानिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर माझा सत्कार केला असल्यामुळे मला सामाजिक काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचे ठोस प्रतिपादन प्राचार्य महादेव गपाट यांनी सत्कारास उत्तर देत असतानी केले. प्राचार्य महादेव गपाट यांच्या ३३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली साक्षी पावनज्योत व प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्राचार्य महादेव गपाट यांच्या अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात दिनांक ३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संपन्न झाला. याप्रसंगी संपादक सुभाष घोडके यांनी वाढदिवसानिमित्त केलेल्या सत्कारामुळे सत्कारमूर्तीचा आनंद उत्साह द्विगुणित होत असून त्यांनी केलेल्या कार्याच्या कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडल्यामुळे त्यांना पुढील कार्यास प्रेरणा मिळत असल्यामुळेच या सत्काराचे आयोजन केले असल्याचे सांगितले तर अध्यक्षीय समरोपातून जेष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत यांनी प्रा.महादेव गपाट यांच्या कार्याचे कौतुक करून बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंच्या विचारांच्या वाटेने गपाट यांचा प्रवास सुरू असल्याने त्यांचे कार्य कौतुकास पात्र असल्याचे सांगितले.या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक सुफी सय्यद शमशोद्दीन,पत्रकार प्रदीप यादव, राजेंद्र बारगुले,परमेश्वर खडबडे, महेश गपाट,सफाई कामगार नेते महावीर गायकवाड,सुशील वाघमारे यांनी मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे बहारदार असे सूत्रसंचालन व आभार प्रा.अविनाश घोडके यांनी केले.
More Stories
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट