August 9, 2025

भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचा छात्रसेवाकाल शिबिर संपन्न

  • कळंब – मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा राज्यस्तरीय स्पर्धेत लातूर विभागांतून कळंब तालुक्यातील भाटशिरपूरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे व सर्व सहकारी शिक्षक वृंद,शालेय व्यवस्थापन यांच्या प्रयत्नाने केंद्र,तालुका व जिल्हा अशा तीन स्तरांवर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेत दि.५ मार्च २०२४ रोजी भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचा छात्रसेवाकाल शिबिर घेण्याचा योग आला.
    या प्रसंगी माळी जे.एस,निकम बी.एस,मुंडे डि.टी,श्रीमती थोरात आर.पी,श्रीमती पाटील जे.डी,भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके आदींची उपस्थिती होती.
    यावेळी शाळेतील पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना छात्राध्यापिक बालाजी कोरे व छात्राध्यापिका साक्षी सोनवणे,वैष्णवी सुरवसे,साक्षी वायसे यांनी अध्यापन केले.
error: Content is protected !!