धाराशिव – स्वच्छता ही सेवा’ हा कार्यक्रम धाराशिव जिल्ह्यात दि.१ ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ.रामेश्वर कोठावळे (राज्य संपर्क अधिकारी व विशेष कार्य अधिकारी रा.से.यो. उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय, मुंबई),अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक धाराशिव ), डॉ. दीक्षित (संचालक- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उपपरिसर, धाराशिव),संतोष कोष्टी (एस.टी.आगार प्रमुख धाराशिव),रवींद्र कराड (गुप्त वार्ता विभाग धाराशिव),राष्ट्रीय सेवा योजना धाराशिव जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.बालासाहेब मैंद व प्रा.डॉ. मकरंद चौधरी,धाराशिव मधील विविध कॉलेजचे कार्यक्रमाधिकारी,प्राध्यापक व रा.से.या.चे स्वयंसेवक विद्यार्थी- विद्यार्थीनी यांनी एस.टी.वर्कशॉप,बस स्टॅन्ड व स्त्री रूग्णालय धाराशिव येथे स्वच्छता केली व स्वच्छतेची शपथ सर्वांना देण्यात आली.यावेळी डॉ.रामेश्वर कोठावळे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करत असताना सांगितले की स्वच्छता ही तीन प्रकारच्या असतात २. स्वयंम स्वच्छता २. सार्वजनिक स्वच्छता व ३. सामाजिक स्वच्छता आज दहा ते अकरा या वेळेमध्ये स्वच्छता मोहीम राबवली गेली. सार्वजनिक स्वच्छता करणे ही काळाची गरज आहे. पण ती स्वयंम स्वच्छतेची, मनाच्या स्वच्छतेची व सामाजिक स्वच्छतेची. आरोग्य, व्यसनमुक्ती, सामाजिक बांधिलकी, स्वयं निर्भर होण्याबाबत मार्गदर्शन केले. युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमातर्गत अमृत कलश संकलन, अमृत कलश यात्रा, अमृत वाटिका, भूमीस वंदन व वीरांचा सन्मान, शिलाफलक, पंचप्रण, गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी सेल्फी फोटो लिंकला अपलोड करणे बाबत सांगून. मेरी माटी मेरा देश अंतर्गत अमृत कलश संकलन व अमृत कलश यात्रा १ ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये संपूर्ण देशात शाळा व महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी धाराशिव शहरातील आर पी कॉलेज, महाजन कॉलेज, तेरणा कॉलेज, बी फार्मसी कॉलेज व विद्यापीठाचे उपकेंद्र येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे सेवक व कार्यक्रम अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी