कळंब (जयणारायन दरक ) – कळंब येथे जनजागृती माध्यमिक विद्यालयात स्वयं शासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या स्वयं शासन दिनाचे मुख्याध्यापक कु.सय्यद अबूबकर खिजर तर उप मुख्याध्यापिका कु. पठाण तहुरा फेरोज यांनी स्वयं शासन दिनाचे काम पाहिले तर इतर सर्व विध्यार्थ्यानी शिक्षकांची भूमिका पार पाडली. सर्व तासिका झाल्या नंतर विध्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सिरसाट गौतम रामचंद्र तर प्रमुख पाहुणे गुंडरे डी. ई. संस्कृतीक विभाग प्रमुख शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय हे होते. या कार्यक्रम प्रसंगी संदीप सूर्यवंशी,शाळेतील कर्मचारी जोगदंड व्ही.आर,चेवले व्ही एच, मोरे एन सी,कदम व्ही बी, देवकत्ते डी डी, चव्हाण एस व्ही, गायकवाड एम वाय,कठारे एस एम, ताकपीरे के व्ही, पवार डी जी, करंजकर एस के, इंगळे एस एम आदी कर्मचारी उपस्थित होते. इयत्ता नववीच्या सर्व विदयांर्थ्यानी कार्यक्रम पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन