August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • “मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”
  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.21 फेब्रुवारी रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 65 कारवाया करुन 34,300 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
  • मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल बुधवार दि.21.02.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 8 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव 120 लि. व सुमारे 522 लि. गावठी दारु, 22 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव, व देशी विदेशी दारुच्या 29 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर मद्य जप्त करुन त्यांची एकत्रीत किंमत अंदाजे 46,270 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 6 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
  • 1)वाशी पोलीस ठाणेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-1)ऋष्सीकेस रामदार लोकरे, वय 23वर्षे, रा. पिंपळगाव लिंगी ता. वाशी जि. धाराशिव हे 18.30 वा. सु. लिंगी पिंपळगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कमानीचे जवळ पत्रयाचे शेडमध्ये अंदाजे 2,470 किंमतीची 20 लि. गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-2) सुखदेव भिमराव गाडे, वय 55 वर्षे, पिंपळगाव लिंगी ता. वाशी जि. धाराशिव हे 12.10 वा. सु. पिंपळगाव लि. येथे पाण्याचे टाकीजवळ पत्रयाचे शेडमध्ये अंदाजे 2,190 किंमतीची 20 लि. गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 7 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-3)सज्जन पांडुरंग गाडे, वय 42 वर्षे, रा. पिंपळगाव लिंगी ता.वाशी जि. धाराशिव हे 21.00 वा. सु. पिंपळगाव लिंगी येथे चहाचे हॉटेलमध्ये अंदाजे 2,230 किंमतीची 17 लि. गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
  • 2)कळंब पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-फन्टी शंकर पवार, वय 25 रा. कल्पना नगर पारधी पीडी कळंब ह.मु. पाण्याचे टाकीजवळ मार्केट यार्ड कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे 00.05 वा. सु. मार्केट यार्ड मधील पाण्याचे टाकी जवळ कळंब येथे अंदाजे 7,900 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु व 120 लि. गुळमिश्रित रासायनिक द्रव जप्त करण्यात आले. आरोपी नामे-राणी शंकर काळे, वय 36 वर्षे, रा.इंदीरानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे 16.16 वा. सु. देवी मंदीर रोड कळंब येथे अंदाजे 11,700 ₹ किंमतीची 195 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 3) बेंबळी पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-विशाल सुरेंश काळे, वय 21 रा. रामनगर झोपडपट्टी बेंबळी ता. जि. धाराशिव हे 16.30 वा. सु. रामनगर झोपडपट्टी येथे पत्रयाचे शेडमध्ये अंदाजे 5,000 ₹ किंमतीची 50 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 4) मुरुम पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-सतिश शामराव बनसोडे, वय 51 रा. सुंदरवाडी, ता. उमरगा जि. धाराशिव हे 16.30 वा. सु. आपल्या राहात्या घराचे पाठीमागे अंदाजे 2,300 ₹ किंमतीची 22 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव जप्त करण्यात आले.
  • 5) धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-सिध्दार्थ काका सिरसाठ, वय 45 वर्षे, रा. नागनाथ रोड भिमनगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे 19.40 वा. सु. क्रांतीचौक भिमनगर धाराशिव येथे अंदाजे 12,480 ₹ किंमतीची 210 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान नळदुर्ग पोलीसांनी दि.21.02.2024 रोजी 15.20 ते 16.10 वा. सु. नळदुर्ग पो. ठा. हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)संजयकुमार लिंबाजी गायकवाड, वय 32 वर्षे, रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 15.20 वा. सु. नळदुर्ग बसस्थानकच्या बाजूला अक्कलकोट रोडवर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,620 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 2)दिनकर प्रभाकर सुरवसे, वय 40 वर्षे, रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 16.10 वा. सु. जळकोट बसस्थानकचे बाजूला कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,000 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • मुरुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान मुरुम पोलीसांनी दि.21.02.2024 रोजी 18.00 वा. सु. मुरुम पो. ठा. हद्दीत ग्रामपंचायत गाळेचे बाजुस येणेगुर येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)बालाजी श्रीमंत पोपळे, वय 42 वर्षे, रा. येणेगुर ता. उमरगा ता. धाराशिव हे 18.00 वा. सु. ग्रामपंचायत गाळेचे बाजूस येणेगुर येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,250 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • बेंबळी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान बेंबळी पोलीसांनी दि.21.02.2024 रोजी 16.30 वा. सु. बेंबळी पो. ठा. हद्दीत समुद्रवाणी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)सुनिल माणिक अवतारे, वय 46 वर्षे, रा. समुद्रवाणी ता. जि. धाराशिव हे 16.30 वा. सु. समुद्रवाणी येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,660 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) मारुती भिमराव सावंत, वय 25 वर्षे, रा. येडोळा ता. तुळजापूर जि. धाराशिव, हे दि.20.01.2024 रोजी 19.15 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एए 9861हॉटेल सितारा नळदुर्ग समोर रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • तुळजापूर पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) गणेश विष्णु लोंढे, वय 25 वर्षे, रा. मातंग नगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.21.01.2024 रोजी 21.34 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एझेड 0725 ही आठवडी बाजार रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • ढोकी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) सुरज प्रकाश कटारे, वय 25 वर्षे, रा. मळवटी गाव लातुर ता.जि. धाराशिव हे दि.20.01.2024 रोजी 12.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 24 यु 6191 ही पेट्रोलपंप ढोकी येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
  • ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)फारुक मुसा सय्यद, वय 35 वर्षे रा. ढोकी ता. जि.धाराशिव, 2) सुरज सतीश चौधरी, वय 19 वर्षे, रा. पिंपळवाडी ता. बार्शी जि. सोलापूर, 3) नाना राजेंद्र कोकरे,, वय 18 वर्षे, रा. पेठ तेर ता. जि. धाराशिव, 4) गणेश कमलाकर नवगिरे, वय 24 वर्षे, रा. वाटवडा ता. कळंब जि. धाराशिव, 5) विक्रम विश्वनाथ चव्हाण, वय 40 वर्षे, रा. म्होतरवाडी ता.जि. धाराशिव हे सर्वजन दि.20.02.2024 रोजी 11.15 ते 16.30 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे ॲटो रिक्षा क्र एमएच 07 बी 9902, ट्रॅक्टर क्र एमएच 13 डीएम 8605, मोटरसायकल क्र एमएच 13 डब्ल्यु 2868, मोटरसायकल क्र एमएच 25 एआर 3461, मोटरसायकल क्र एमएच 25 बीबी 4426 हे ढोकी पेट्रोलपंप चौक येथे व संत गोरोबा काका मंदीर समोरील रोडवर वेगवेगळ्या दोन ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना ढोकी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये ढोकी पो.ठा. येथे स्वतंत्र 5 गुन्हे नोंदवले आहेत.
  • मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)अंदप्पा गोंविद टिकंबरे, वय 41 वर्षे, रा. दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव, 2) महेश महाळप्पा गाडेकर, वय 30 वर्षे, रा. येणेगुर ता. उमरगा जि. धाराशिव, 3) शिवशंकर बसवराज वाले, वय 32 वर्षे, रा. दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव हे सर्वजन दि.21.02.2024 रोजी 17.10 ते 18.35 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे ॲटो रिक्षा क्र एमएच 12 एआर 4031, ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एम 213, ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एन 633 हे येणेगुर बसस्थानक व कोराळमोड येथे वेगवेगळ्या दोन ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये मुरुम पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)नितीन दिगंबर भुमकर, वय 60 वर्षे रा. दसमेगाव ता. वाशी जि.धाराशिव, हे दि.20.02.2024 रोजी 11.30 वा. सु. आपल्या ताब्यातील टमटम क्र एमएच 25 एएन 183, हे छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना वाशी पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये वाशी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)अशोक रामदास शिंदे, वय 35 वर्षे रा. बावी ता. वाशी जि. धाराशिव, हे दि.21.02.2024 रोजी 13.50 वा. सु. आपल्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप क्र एमएच 25 एजे 3920 हे छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये कळंब पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)सिध्दार्थ संजय बनसोडे, वय 29 वर्षे रा. भिमनगर नळदुर्ग ह.मु. अपसिंगा ता. तुळजापूर जि. धाराशिव, हे दि.21.02.2024 रोजी 11.00 ते 11.30 वा. सु. आपल्या ताब्यातील महिंद्रा मॅक्सीमो क्र एमएच 13 एझेड 9841 हे तुळजापूर बसस्थानक समोर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना तुळजापूर पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालाविरुध्दचे गुन्हे.”
  • ढोकी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- स्वप्निल शहाजी ढेकणे, वय 26 वर्षे, रा. पेठ तेर ता. जि. धाराशिव यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 14.02.2024 रोजी 21.00 ते दि. 19.02.2024 रोजी 6.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील सॅनसुई कंपनीची 32 इंची एलईडी टिव्ही, चांदीचे दागिने व रोख रक्कम 25,000₹ असा एकुण 55,600 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- स्वप्निल ढेकणे यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 454, 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • येरमाळा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- धर्मराज बळीराम भातलवंडे, वय 66 वर्षे, रा. शेलगाव दिवाणे ता. कळंब जि. धाराशिव यांचे शेत गट नं 38/39 मधुन महिंद्रा सस्टेन प्रा. लि. मोड्युल 335 डब्ल्यु पी असे एकुण 9 सोलार प्लेट अंदाजे 30,000₹ किंमतीच्या ह्या दि. 02.02.2024 रोजी 18.00 ते दि. 03.02.2024 रोजी 07.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- धर्मराज भतलवंडे यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तामलवाडी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- शरद लक्ष्मण खराडे, वय 43 वर्षे, व्यवसाय इनरीच एनर्जी प्रा. ‍लि. सावरगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे शेतातील कॉपर केबल वायरचे एकुण 18 केबल ड्रम अंदाजे 3,60,000 ₹ किंमतीचा माल हा अज्ञात व्यक्तीने दि. 18.02.2024 रोजी 01.30 ते 02.30 वा. सु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शरद खराडे यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)वैजिनाथ यशवंत करनुरे, वय 32 वर्षे,2) संदीप यशवंत करनुरे, वय 25 वर्षे, 3) संजय व्यंकट करनुरे, वय 42 वर्षे, 4)सचिन संजय करनुरे, वय 22 वर्षे, 5)बालिका यशवंत करनुरे, वय 55 वर्षे, 6) सुनिता राजकुमार करनुरे, वय 53 वर्षे, 7) भामाबाई किशन चिरे, वय 60 वर्षे, 8) एकनाथ किसन चिरे सर्व रा. भगतवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 20.02.2024 रोजी 18.00 ते 19.00 वा. सु. भगवतवाडी येथे फिर्यादी नामे- राजकुमार बंकटराव करनुरे, वय 49 वर्षे, रा. भगतवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेत रस्त्याच्या कारणावरुन गैर कायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, हंटर, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचे पत्नी जयश्री, अपेक्षा, बालाजी, विक्रम यांनी भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. व तुम्हाला सर्वांना बघुन घेतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- राजकुमार बंकटराव करनुरे यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 336, 504, 506, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)राजकुमार बंकट करनुरे, 2) विक्रम राझु करनुरे, 3) कुलदिप विक्रम करनुरे, 4) दिपक विक्रम करनुरे, 5) रादिप विक्रम करनुरे, 6) बालाजी बाबु करनुरे, 7) बबिता बालाती करनुरे, 8) धुळबा बालाजी करनुरे, 9) जयश्री राजकुमार करनुरे, सर्व रा. भगवतवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 20.02.224 रोजी 19.30 ते 20.00 वा. सु. भगतवाडी येथे फिर्यादी नामे- वैजीनाथ यशवंत करनुरे, वय 33 वर्षे, रा. भगवतवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांना शेतरस्त्याचे करणावरुन गैर कायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कोयता, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचे एकनाथ चिरे, यशवंत करनुरे हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- वैजीनाथ करनुरे यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ रस्ता अपघात.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे : मयत नामे-1) सौरभ सुभाष सदनी, रा. हातकनंगले, जि कोल्हापुर, 2) विजय बबन जाधव रा. बेडक रा. मिरज, हे तिघे दि.15.02.2024 रोजी 17.30 वा. सु. तुळजापूर ते धाराशिव जाणारे रोडवर गोकर्णा पेट्रोल पंप जवळून अशोक लिलॅड दोस्त क्र एमएच 09 जीजे 2716 मधून जात होते. दरम्यान ट्रक क्र आरजे 01 जीसी 2366 च्या चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक हा हायगीयीने व निष्काळजीपणे रोडचे परिस्थीकडे दुर्लक्ष करुन अविचाराने कुठल्याही प्रकारचे फिलेक्टर व इंडीकेटर न लावता धोकादायक स्थितीत हायवेवर उभा केल्यामुळे अशोक लिलॅड दोस्त हा ट्रकला पाठीमागून जावून धडकून अपघात झाला. या अपघातात सौरभ सदनी व विजय जाधव हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर आमीत विठ्ठल जाधव रा. बेडक ता. मिरज जि. सांगली हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुभाष सदाशिव सदनी, वय 48 वर्षे, रा. मजले ता. हातकनंगले जि. कोल्हापूर यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 338, 304(अ) सह 134 (अ)(ब), 122/177 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • भुम पोलीस ठाणे : मयत नामे-1)रवि दत्तात्रय नलवडे, वय 25 वर्षे, व सोबत जखमी नामे- 2) ऋषीकेश सुर्यकांत नलवडे, वय 22 वर्षे रा. वारेवडगाव, ता. भुम जि. धाराशिव हे दोघे दि. 19.02.2024 रोजी 00.30 वा. सु. भुम ते पाथरुड रोडवरील उळूप येथील सोनारी दुध डेअरी जवळुन मोटरसायकल क्र एमएच 25 एआर 3562 वरुन जात होते. दरम्यान क्रुझर क्र एमएच 13 बीएन 4369 चा चालकाने त्याचे ताब्यातील क्रुझर ही हायगई व निष्काळजीपणे चालवून रवि नलवडे व ऋषीकेश नलवडे यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात रवि नलवडे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर ऋषीकेश नलवडे हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दत्तात्रय पांडुरंग नलवडे, वय 33 वर्षे, रा. वारेवडगाव ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, 304(अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ नुकसान करणे.”
  • परंडा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- दिनकर संभाजी सुरवसे, वय 51 वर्षे रा.भोत्रा ता. परंडा जि. धाराशिव यांचे भोत्रा शिवारातील शेत गट नं 01 मधील उसाचे पिकाला आरोपी नामे- 1)लक्ष्मण बळीराम शेलार, 2)आवडाबाई लक्ष्मण शेलार, 3) आनंद नंदेश्वर शेलार, सर्व रा. भोत्रा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 20.02.2024 रोजी 17.30 ते 18.00 वा. सु. आग लावूनअंदाजे एक एकर उसाचे पाईपचे 9 नळ्या, एक टी व एक कॉक असे एकुण 54,000₹ किंमतीचे नुकसान केले. तसेच फिर्यादी यांनी नमुद आरोपींना तुम्ही असे का केले असे विचारले असता नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दिनकर सुरवसे यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 435, 427,, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “अपहारण.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-कैलास शंकर चव्हाण, वय 43 वर्षे, रा. जवळ नि. ता. परंडा जि. धाराशिव यांचा मुलगा नामे- ज्ञानेश्वर शंकर चव्हाण, वय 16 वर्षे रा. जवळ नि. ता. परंडा जि. धाराशिव यांना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन दि.20.02.2024 रोजी 12.30 वा. सु. शासकिय तंत्रनिकेतन कॉलेजच्या पाठीमागे धाराशिव येथुन फुस लावून पळवून नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कैलास चव्हाण यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव पो. ठाणे येथे कलम 363 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल.”
  • भुम पोलीस ठाणे : मयत नामे- बापु रावसाहेब कांबळे, वय 65 वर्षे, रा. बावी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.21.02.2024 रोजी 06.00 वा. पुर्वी राहाते घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे-1) बाबा नाना कांबळे, 2) नाना ईश्वर कांबळे(पाटील), 3) संगीता ढवळे, 4) महादु नायकिंदे, 5) संतु आरसुळे रा. पाटसांगवी , 6) अन्नपुर्णाबाई यांनी मयत बापू कांबळे व्याजाचे पैशाचे कारणावरुन मानसिक त्रास दिल्याने नमुद आरोपींच्या जाचास व त्रासास कंटाळून बापू कांबळे यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा फिर्यादी नामे-अविनाश बापु कांबळे, वय 31 वर्षे, रा. बावी ता. भुम जि. धाराशिव, ह.मु. मोरीया हाउसिंग सोसायटी मोरे वस्ती चिखली पुणे यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 306, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
error: Content is protected !!