August 9, 2025

22 फेब्रुवारी रोजी भूम येथे मधमाशापालक शेतकरी जनजागृती मेळावा

  • धाराशिव (जिमाका) – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ,धाराशिव यांच्या वतीने मधकेंद्र योजनेंतर्गत मधमाशापालक शेतकरी जनजागृती मेळावा भूम पंचायत समिती सभागृह,पंचायत समिती कार्यालय येथे गुरुवार, 22 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
    या मेळाव्यात मधकेंद्र योजना, मधमाशापालन,पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम,मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तसेच पीएम विश्वकर्मा या योजनांची माहिती शेतकरी,फलोत्पादक,सेंद्रीय शेती उत्पादक शेतकरी तसेच सुशिक्षीत बेरोजगार व महिला बचतगट, तरुण-तरुणी,सर्व घटकांतील युवक-युवतींना देण्यात येणार आहे. तरी या मेळाव्यास उपस्थित राहून योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी डी.व्ही. फताटे यांनी केले आहे.
error: Content is protected !!