कळंब – तालुका वंचित बहूजन आघाडीच्या वतीने दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी कळंब शहरातील उपजिल्हा रुग्णालया समोरुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाप्रमुख बी.डी.शिंदे,जिल्हा नेते अनिल हजारे,तालुका नेते कुणाल मस्के, उद्योजक विनोद समुद्रे,डॉ.एस.एम.कांबळे, बालाजी टोपे,धनंजय ताटे, काळदाते व जयंती कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब धावारे यांनी हार घालून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे गाजत वाजत मिरवणूक कळंब बसस्टॉप ऐरीया-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- शिवाजी महाराज चौक मध्ये – अहिल्याबाई होळकर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व जयंतीची सांगता करण्यात आली.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले