कळंब – बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी कळंब शहरातून दर मंगळवारी प्रकाशित होणाऱ्या सा.साक्षी पावनज्योतचा कुलवाडीभुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव विशेषांक – २०२४ चे प्रकाशन शहरातील शिवाजी महाराज चौकात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातील ह.भ.प महादेव आडसूळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सा.साक्षी पावनज्योतच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी समाजवादी नेते सायसराव जाधव,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अँड.तानाजी चौधरी,माजी नगरसेवक डॉ.सुनील गायकवाड,सा.साक्षी पावनज्योत मुख्य संपादक सुभाष घोडके,दै.लोकमत तालुका प्रतिनिधी बालाजी आडसुळ,सा.जनतेचे शस्त्र देशभक्त संपादक लक्ष्मण शिंदे,लहुजी शक्ती सेनेचे किरण सहाणे,अक्षय हजारे,सा.साक्षी पावनज्योत कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके,विशेष प्रतिनिधी राजेंद्र बारगुले,शिराढोण प्रतिनिधी परमेश्वर खडबडे,दत्त नगर प्रतिनिधी विशाल पवार,बाबा नगर प्रतिनिधी शिवराज पौळ,शहर प्रतिनिधी महेश फाटक आदींची उपस्थिती होती.
*विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक – शहरातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातही सा.साक्षी पावनज्योतच्या शिवजन्मोत्सव विशेषांकाचे प्रकाशन संपन्न झाले. याप्रसंगी सावित्रीबाई फुले विद्यालयाचे काकासाहेब मुंडे,माजी नगरसेवक डॉ.सुनील गायकवाड,लोजपा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड,सुरेश इंगळे,सामाजिक कार्यकर्ते कैलाश जावळे,भाऊसाहेब कुचेकर, आर.पी.आय चे तालुकाध्यक्ष किशोर वाघमारे,व्यावसायिक प्रविण गायकवाड,बांधकाम कन्ट्रक्शनचे माणिक गायकवाड,मोहन गायकवाड,फार्माशीष्ट नरसिंह पवार,पत्रकार सचिन तिरकर,नितीन हौसलमल,सागर पट्टेकर,कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके आदींची उपस्थिती होती.
* वेद शैक्षणिक संकुल – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात सा.साक्षी पावनज्योतचा शिवजन्मोत्सव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे, प्रा.श्रीकांत पवार,प्रा.सागर पालके,कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके, विनोद कसबे आदींची उपस्थिती होती.
कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीचे औचित्य साधून दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी शहरातून प्रकाशित होणारा सा.साक्षी पावनज्योतचे कळंब शहर प्रतिनिधी म्हणून महेश फाटक यांची नियुक्ती ही कायदेशीर सल्लागार अँड.शकुंतला सावळे-फाटक यांच्या हस्ते ओळ्खपत्र देवून करण्यात आली. याप्रसंगी मुख्य संपादक सुभाष द.घोडके,कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके यांची उपस्थिती होती..
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले