लातूर ( दिलीप आदमाने ) – महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, जयंती उत्सव समिती आणि आस्थापना विभाग, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय समाज सुधारक क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांची जयंती महाविद्यालयातील प्राचार्य कक्षात उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे उपस्थित होते. सर्वप्रथम भारतीय समाज सुधारक क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला सर्वांच्या उपस्थितीत पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ संजय गवई, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, कार्यालय नामदेव बेंदरगे यांनी मनोगते व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नेश्वर स्वामी यांनी केले तर आभार विरसेन उटगे यांनी केले. या कार्यक्रमाला यशपाल ढोरमारे, विनायक लोमटे, महादेव स्वामी, श्रीशैल्य पाटील, योगीराज माकने, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी आदी उपस्थित होते.
More Stories
अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शनात जिजामाता विद्यालयाची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक
सामाजिक कार्यासाठी सुफी सय्यद शमशोद्दीन यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव
“बौद्ध धम्म हा समतेचा मार्ग” – भिक्खू पय्यानंद थेरो