मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाला विकासाचा मानबिंदू, “वामन दादा म्हात्रे ” यांच्या हस्ते भावी नगरसेवक गणेश राणे यांच्या वार्डात विविध विकास कामाचे भूमीपूजन.!
बदलापूर – (तात्यासाहेब सोनवणे)यांजकडून दि.०९ फेब्रुवारी २४ ) ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील विकासाचा मानबिंदू शिवसेना शहरप्रमुख “आदरणीय वामन दादा म्हात्रे”,यांच्या हस्ते स्थानिक स्वराज्य संस्था कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या वार्ड क्रमांक ४२ मध्ये भावी नगरसेवक गणेश राणे यांच्या अथक प्रयत्नाने पावणेदोन कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन झाले. यामध्ये दत्तवाडी प्रवेशद्वारापासून जगदंबा मंदिरापर्यंत रस्त्याची दुरूस्ती,कै.द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालयासमोर अद्ययावत गार्डन,जेष्ठ महिला नागरिक कट्टा, वाचनालय, बालगोपाळ विरंगुळा, खेळणी आदींचा समावेश आहे. यावेळी ” वामनदादा म्हात्रे” यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गतीमान सरकारचे कौतुक करून शहर विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी महिला पदाधिकारी यांनी “वामनदादा”, यांचे पंचारती औक्षण केले. भावी नगरसेवक गणेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अतिशबाजी केली. त्यानंतर भलामोठा पुष्पहार घालून यजमान गणेश राणे यांनी भावी नगराध्यक्ष” वामनदादा म्हात्रे” व युवानेते वरूण म्हात्रे ” यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला अंबरनाथ पंचायत समिती मा. सभापती बाळाराम कांबरी, नगरसेवक अरूण सुरवळ,गणेशशेठ शेलार, भाऊ जाधव, सौ. खैरनार, सौ. प्रियाताई सावंत, राणे काका, भोईर, आदी गणेशवाडी, दत्तवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
उल्हास नदी बचाव समितीच्या आंदोलनाला यश;अनधिकृत भराव प्रकरणात दहा कोटीचा दंड
प्रेरणा फाउंडेशनचा मोफत आरोग्य शिबीर व सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा धुमधडाक्यात साजरा
जिंदादिली का दुसरा नाम, जालिंदर सावंत साहेब!