धाराशिव (जिमाका) – पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या मराठवाड्यातील सामान्य नागरिकांच्या आता थेट घरात पाणी मिळावे यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड ही महत्वाची योजना पूर्ण करण्यासाठी शासन कटीबध्द आहे.असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी धाराशिव तालुक्यातील पळसप येथे केले. माजी आमदार कै.वसंत काळे यांच्या १७ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.यावेळी आमदार विक्रम काळे,महादेव जानकर व बाबासाहेब पाटील,साहित्यिक अंजली धानोरकर,सिनेअभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड,शांताबाई वसंतराव काळे,अनिल काळे,ललिता गादगे,अशोक नाईकवाडे,संजय कोरेकर,अशोक काळमकर,हरिदार फेरे,धनंजय रणदिवे,चित्रकार प्रकाश गादगिने, मंगेश निपाणीकर,सुरेश बिराजदार व नंदकुमार गवारे यांची प्रमुख उपस्थिती होती. बनसोडे पुढे म्हणाले, मराठवाड्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड ही महत्वाकांक्षी योजनेचे काम सुरु करण्यात आले आहे.यामुळे मराठवाड्यातील पुढच्या पिढीला पाणीटंचाईची जाणीव होणार नाही. मराठवाड्याचा विकास पश्चिम महाराष्ट्राच्या धरतीवर करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.या योजनेसाठी हजारो कोटी रुपये मंजूर असून यावर्षी हे काम पूर्ण होईल असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आमदार विक्रम काळे यांनी केले. यावेळी आ.महादेव जानकर आणि डॉ. निशीगंधा वाड यांनीही आपली समायोचित भाषणे केली. कार्यक्रमाच्या ठिकाणी छायाचित्र आणि पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षक,विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले