August 9, 2025

सध्याच्या परिस्थितीवर संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत – व्याख्याते अँड.राज कुलकर्णी

  • धाराशिव – भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधान जनजागरण कार्यक्रमात आज रोजी मतदार व भारतीय संविधान या विषयावर व्याख्याने अँड.राज कुलकर्णी यांचे व्याख्यान नवीन नर्सिंग स्कुल धाराशिव येथे घेण्यात आले.
    दि.२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस असुन या दिवसाचे औचित्य साधुन मतदार व भारतीय संविधान याविषयी व्याख्यान आयोजित केले होते.नर्सिंग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अँड.राज कुलकर्णी म्हणाले की,जसे आरोग्याविषयी रुग्णांना सांभाळणे तुम्ही शिक्षण घेत आहेत रुग्णांना औषधोपचार व तुम्हाला शिक्षणाची गरज आहे तसेच देशातील सध्याच्या परिस्थितीवर संविधान वाचविण्याची गरज आहे,देशातील लोकशाहीच्या परंपरेला जतन करण्यासाठी संविधान सांभाळणे महत्त्वाचे आहे.दि.२६ जानेवारी १९३० रोजी भारत पारतंत्र्यात असतांनाही पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय स्वातंत्र्याचे ध्वजारोहण केले होते व तेथुन त्यांनी दरवर्षी दि.२६ जानेवारी रोजी भारतीय स्वातंत्र्याचे ध्वजारोहण केले जात होते,भारत स्वातंत्र्य झालेल्यानंतर प्रजासत्ताक दिन दि.२६ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला,अठरा वर्षे नंतर मतदानाचा अधिकार आपणाला मिळतो हा अधिकार संविधान निर्माते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे,पैशाला,भुलथापांना, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निडरपणे मतदान करा तरच आपला हक्क अबाधित राहील.अशा प्रकारचे मतदार व भारतीय संविधान याबाबतीत अँड.राज कुलकर्णी यांनी विचार मांडले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाबासाहेब गुळीग यांनी संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन केले.क्रांती बनसोडे या विद्यार्थीनीने संविधानाची थोडक्यात माहिती देत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदु कोड बिल व महिलांना दिलेल्या अधिकाराबाबत माहिती दिली.व्याखाते अँड.राज कुलकर्णी यांचा सत्कार नवीन नर्सिंग स्कुलच्या सारिका उपासे यांनी केला.कार्यक्रमाचे अध्यक्षा श्रीमती श्रृती जमदाडे यांचा सत्कार दिपक पांढरे,तर प्रमुख पाहुणे म्हणून अँड उमर मोरवे यांचा सत्कार अंकीता जाधव यांनी केला.कार्यक्रमास मतदार जनजागरण समितीचे सचिव अब्दुल लतिफ,उपाध्यक्ष गणेश रानबा वाघमारे,संघटक संजय गजधने, सहसचिव बाबासाहेब गुळीग, सदस्य रऊफ शेख,सदस्य दिपक पांढरे,तर नवीन नर्सिंग स्कुलच्या प्रतिक्षा चिपडे सह कर्मचारी शिक्षक वर्ग विद्यार्थी व मतदार जनजागरण समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गजधने,प्रस्तावना अब्दुल लतिफ यांनी केली तर रऊफ शेख ब्रदर यांनी *नज़रों से नज़ारे मिले चांद से सितारे मिले बाबा साहेब के संविधान से हमें सब को ईजत व शोहरत मिले* या शेरोशायरीतुन आभार मानले.
error: Content is protected !!