ढोकी (स्वराज धावारे ) – मानवी जीवन गुंतागुंतीचे होत चालले आहे देशासमोर अनेक आव्हाने आहेत. प्रत्येक व्यक्तीकडे नकारात्मक दृष्टिकोन वाढत चाललेला दिसून येत आहे. ही बाब व्यक्तीच्या दृष्टीने व समाजाच्या दृष्टीने घातक आहे. आपणास विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने सकारात्मक दृष्टिकोन मांडला पाहिजे.असे मत कौशल्य विकास विभाग मंत्रालय मुंबई चे सहाय्यक आयुक्त संतोष राऊत यांनी मत व्यक्त केले आहे. वसंतराव काळे महाविद्यालय ढोकी यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य उंच व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान विभाग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा व युवा विकास या विषयाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य हरिदास फेरे व स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य मधुकरराव गायकवाड उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर करियर कट्टा समन्वय प्रा.ज्योती नाडे प्रा.डॉ.महादेव श्रीमांगले उपस्थित होते. पुढे बोलताना संतोष राव म्हणाले की करिअर कट्टा हा उपक्रम केंद्र व राज्य सरकारच्या आधारित विद्यार्थ्यांच्या अंगी अनेक कौशल्य रुजवावी व विद्यार्थी स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभारावा हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सर्व क्षेत्र स्पर्धा परीक्षा माध्यमातून नोकर भरती केली जाते.यासाठी विशेषता अभ्यासक्रम तयार केला जातो व यातून नोकर भरती व्हावीत हा मुख्य उद्देश असतो. विद्यार्थ्यांना यश प्राप्त करायचे असेल तर नियोजनपूर्वक अभ्यास करून यश प्राप्त करता येईल. अध्यक्ष समोर करताना महाविद्यालयाचे प्राचार्य हरिदास फेरे म्हणाले की, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास नियोजन पूर्व तयार करून सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून अभ्यास केल्यास नक्कीच यश प्राप्ती होईल. यावेळी माजी कुलगुरू प्राचार्य मधुकरराव गायकवाड यांनी अनमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रा.डॉ.ज्योती नाडे व सूत्रसंचालन प्रा.डॉ. राजकुमार जाधव व आभार प्रदर्शन करियर कट्टा समन्वय प्राध्यापक डॉ.श्रीमंगले यांनी केले. यावेळी कॉलेजमधील प्राध्यापक,प्राध्यापिका,विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले