March 26, 2026

आशाताई मोरजकर राज्यस्तरीय आदर्श शिक्षीका पुरस्काराने सन्मानित

  • कंडारी (शंकर घोगरे यांजकडून ) – महाराष्ट्र महिला विकास मंच, तासगाव जि सांगली महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय त्रिरत्न महिला प्रेरणा आदर्श शिक्षिका पुरस्कार कंडारी येथील जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा तथा ग्लोबल इज्युकेशनल इस्टीस्ट्युट च्या संस्थापक सचिवशिवमती आशाताई गोरख मोरजकर यांना दि १७ जाने २०२४ रोजी संत नामदेव सभागृह तासगाव येथील जाहीर कार्यक्रमात आमदार सुमनताई पाटील,खासदार संजयकाका पाटील,एल.डी.म्हेत्रे, संस्थापक/अध्यक्ष कालिंदीताई पाटील याच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
    यावेळी जिजाऊ,सावित्री, रमाई यांच्यासारख्या सिद्ध समाजसुधारकांची आठवण म्हणून आपले कार्य व त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढीने घ्यावी.आपल्या कार्यातून देशाची नवी पिढी घडावी याचसाठी आपणास महाराष्ट्र महिला विकास मंच आज आपल्या कार्याचा सन्मान करीत आहे. आपण आदर्श शिक्षिका क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहात. याची समजायला गरज आहे. आपल्या कार्यास पुढील वाटचालीसाठी प्रगतीसाठी महाराष्ट्र महिला विकास मंचच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ग्लोबल इंस्टीट्युट चे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर,बिभीषण गोरे, तुळसाबाई गोरे व प्रेम मोरजकर उपस्थीत होते.
error: Content is protected !!