August 9, 2025

लातूर जिल्हास्तरीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणून रऊफ शेख यांची निवड

  • उदगीर (दिलीप आदमाने ) –
    उदगीर तालुक्यातील वाढवणा (खुर्द ) येथील रहिवाशी युवा कार्यकर्ते, वाढवणा मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्यादित वाढवणा (बु.) या संस्थेचे सचिव रऊफ इस्माईलसाब शेख यांची मत्स्य व्यवसाय क्षेत्रात येणारी नवीन आव्हाने, निर्माण होणाऱ्या अडीअडचणी / समस्या मत्स्योदपादन वाढवणे, मच्छीमारांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देणे, मत्स्य व्यवसायाशी संबंधित धोरणात्मक बाबी/ विविध मुद्दे व योजना इत्यादी बाबीवर उपाययोजना करून समस्याचे निराकरण करण्याकरिता महाराष्ट्र शासन निर्णय मत्स्यवि -2016 / प्र. क्र. 171 (भाग -1) पदुम-13 दि. 21-10-2022 अन्वये गठीत करण्यात आलेल्या लातूर जिल्हास्तरीय समितीवर मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती अशासकीय सदस्य म्हणून महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या शिफारसीनुसार निवड करण्यात आली.
    या समितीमध्ये जिल्हाधिकारी लातूर – अध्यक्ष, सहाय्यक आयुक्त मत्स व्यवसाय लातूर – सदस्य सचिव, पोलीस अधीक्षक लातूर – सदस्य, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) लातूर – सदस्य, सर्व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता – सदस्य, अशा स्वरूपाची ही शासकीय समिती असून, रऊफ शेख यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे , अहमदपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अफसर बाबा शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे उदगीर शहर अध्यक्ष समीर शेख राकाँपा सांस्कृतिक विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष अभिजीत औटे, राकाँपा अल्पसंख्यांक विभगाचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष शफी हाशमी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रदीप जोंधळे यांच्यासह मित्रपरिवारांनी या निवडी बद्दल अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!