कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ.संभाजीनगर सलंग्नित छ.शिवाजी महाविद्यालय,कळंब व रासेयो/आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१४ जानेवारी २०२४ रोजी महाविद्यालयात ‘विद्यापीठ नामविस्तार दिना’ निमित्त कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा.पंडित शिंदे ,डॉ.रघुनाथ घाडगे,विठ्ठल फावडे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील डॉ.अनंत नरवडे प्रा.मिटकरी,जयसिंग चौधरी सुंदर कदम,दत्तात्रय कांबळे, अशोक भोसले व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले