August 9, 2025

डाॅ.जाधवर व प्रा.पवार यांच्या वाढदिवसानिमित्त फकीरा कादंबरी भेट

  • कळंब (राजेंद्र बारगुले) – कळंब तालुक्यातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.रमेश जाधवर व प्रा.विनोद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मानवहित लोकशाही पक्षाचे कळंब तालुका अध्यक्ष धनंजय ताटे यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा कादंबरी सप्रेम भेट देण्यात आली. या वेळी मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हा संघटक अंकुश झोंबाडे, अतुल झोंबाडे, पोलीस पाटील अवधूत हिंगमिरे,अशोक झोंबाडे, राहुल बनसोडे, शैलेश शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!