कळंब (राजेंद्र बारगुले) – कळंब तालुक्यातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.रमेश जाधवर व प्रा.विनोद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मानवहित लोकशाही पक्षाचे कळंब तालुका अध्यक्ष धनंजय ताटे यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा कादंबरी सप्रेम भेट देण्यात आली. या वेळी मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हा संघटक अंकुश झोंबाडे, अतुल झोंबाडे, पोलीस पाटील अवधूत हिंगमिरे,अशोक झोंबाडे, राहुल बनसोडे, शैलेश शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले