उस्मानाबाद (दिपक माळी) – पत्रकारांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या व्हाईस ऑफ मीडिया ह्या संघटनेच्या डिजिटल मीडिया विभागाच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी सलीम पठाण यांची निवड करण्यात आली आहे. बदलत्या जगा नुसार एका क्लिकवर राज्यातील त्याचबरोबर देश-विदेशातील बातम्या प्रत्येकाच्या मोबाईल वरती झळकत असतात. क्षणाक्षणाची ताजी अपडेट पोहोचवण्याचे काम डिजिटल मिडिया करत आहे. प्रत्येक मिनिटाला अपडेट होणाऱ्या जगात बातम्यांचे माध्यमं देखील अपडेटेड झाली आहेत. त्यामुळे वृत्तपत्र , प्रसार माध्यमांच्या बरोबरच डिजिटल मिडिया देखील वाचक व दर्शकांपर्यंत बातम्या पोहचवत आहे. डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी व शासनापर्यंत विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने डिजिटल मीडियाची स्थापना करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये आठ वर्षापासून डिजिटल मीडियामध्ये काम करणारे उस्मानाबाद न्यूज डाट ईनचे संपादक सलीम पठाण यांची डिजिटल मीडिया जिल्हा उपाध्यक्षपदी आज दि. २७ डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्ष सारिका महोत्रा यांच्या हस्ते करण्यात आली आहे. धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात व्हाईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, राज्य समन्वयक प्रसिद्धी प्रमुख तथा प्रवक्ते रहीम शेख, मराठवाडा उपाध्यक्ष अमर चोंदे, महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष वैभव पारवे, धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, आकाश नरोटे, अमोल रणदिवे, रामरतन कांबळे, इरफान शेख, असिफ मुलानी, शाहरुख सय्यद, किशोर कांबळे, कुंदन शिंदे, किरण कांबळे, विशाल जगदाळे, किशोर माळी, रामराजे जगताप ,विश्वनाथ जगदाळे, सलमान मुल्ला, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान