कळंब (महेश फाटक ) – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील छत्रपती संभाजी महाराज नगरांतील वेद शैक्षणिक संकुलातील भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विजतंत्री/तारतंत्री व्यवसायातील Hostel wiring with remote control या मॉडेलची दि.२१ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात निवड होऊन विभागीय स्तरावर होणाऱ्या तंत्र प्रदर्शनासाठी पात्र ठरला आहे. या सर्व सहभागी यशस्वी प्रशिक्षणार्थींचा संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात पुष्पगुच्छ देवून यथोचित सन्मान करण्यात आला. या यशानिमित्त डॉ.प्रतापसिंह पाटील व प्राचार्य सतिश मातने यांनी कौतुक करून विभागीय स्तरांवर होणाऱ्या प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे,प्रा.श्रीकांत पवार,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,प्रा.मोहिनी शिंदे,निदेशक अविनाश म्हेत्रे, निदेशक सागर पालके,निदेशिका कोमल मगर,लिपिक आदित्य गायकवाड,विनोद कसबे यांची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले