तुळजापूर (जयनारायण दरक ) – तालुक्यातील अणदूर येथील एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने शेजारी राहणाऱ्या तरुणीला लाथाबुक्यांनी, लोखंडी पाइपने डोक्यात मारहाण करुन तसेच अॅसिड सारखा पदार्थ हातावर फेकून गंभीर जखमी केले. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये सदर नराधम तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नामे मनोज मल्लीनाथ घोडके,रा. अणदुर ता. तुळजापूर याने दि.16.12.2023 रोजी 10.30 वा. सु. घोडके वस्ती अणदुर येथे फिर्यादी नामे-रेवती तुळशीदास घोडके, वय 20 वर्षे, रा. घोडके वस्ती अणदुर ता. तुळजापूर जि.धाराशिव यांना नमुद आरोपीने घरात घुसून तु मला का बोलत नाही तुझ्यावर माझे प्रेम आहे असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाइपने डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच अॅसिड सारखा पदार्थ फिर्यादीचे हातावर टाकुन गंभीर जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- रेवती घोडके यांनी दि.16.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 326(अ), 324, 323, 452, 504, 506 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश