August 9, 2025

सावकाराच्या जाचास कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

  • कळंब – मी कुटुंबासाठी काहीही करू शकलो नाही,…मला माफ करा,लोकप्रतिनिधीने लक्ष दिले असते तर मी आत्महत्या केली नसती अशी चिठ्ठी सोशल मीडियावर टाकत पिंपळगाव डोळा येथील तरुण शेतकरी अण्णा केरबा काळे वय ४७ यांनी सावकारी कर्जाला कंटाळून दि.१८ डिसेंबर २०२३ रोजी पहाटे ६ च्या आसपास गळपास घेवून आत्महत्या केली.
    त्यांच्या पश्चात आई,दोन भाऊ,पत्नी,मुलगा व मुलगी आहेत.
    सोशल मीडियावर टाकलेल्या चिट्टी मध्ये, सावकार,तेरणा कारखाण्याचे संबंधित आधिकारी यांची नावे लिहून त्यांनी कसा छळ केला याची माहिती नमूद केली आहे.
    पालकमंत्री तानाजी सावंत यांना हि या पत्रातून आपल्या तेरणा साखर कारखान्याने जर मदत केली असती तर मी आत्महत्या केली नसती असेही नमूद करण्यात आले आहे.
    अण्णा काळे यांनी उचललेले हे टोकाचे पाऊल योग्य नसल्याने पिंपळगाव (डोळा) व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
error: Content is protected !!