April 10, 2026

जिल्हा परिषद सीईओ प्रियंवदा महाडदळकर यांचे पुस्तक देऊन स्वागत

  • धाराशिव – जिल्हा परिषद धाराशिव यांच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेल्या प्रियंवदा महाडदळकर यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.यावेळी माजी पंचायत समिती सभापती तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सतीश घोडेराव यांनी त्यांचा सत्कार केला.
    या प्रसंगी सतीश घोडेराव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रतीक म्हणून त्यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले. समाज परिवर्तन,समता आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
    यावेळी उपस्थित मान्यवरांनी नूतन सीईओ प्रियंवदा महाडदळकर यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि समाजातील विविध घटकांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
    स्वागत समारंभ प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे प्रशासन आणि समाज यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
error: Content is protected !!