मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कैलासवासी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना कृतज्ञ अभिवादन करण्याचा भावपूर्ण कार्यक्रम ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे उत्साहात पार पडला. गुरुवारी दि.०२ एप्रिल २०२६ आयोजित या कार्यक्रमात शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला. ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यालयीन कर्मचारी दिगंबर शिंदे यांच्या हस्ते शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत त्यांच्या दूरदृष्टीमुळेच संस्थेची भक्कम पायाभरणी झाली असल्याचे सांगितले.त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळे अनेक विद्यार्थी घडले असून शिक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. या प्रसंगी पर्यवेक्षक सतीश कानगुडे,डी.बी.मडके,संजय आडने,जनार्दन भामरे,सुर्यकांत गुंगे,सतीश मडके,शैलेश गुरव, ज्योतिराम सोनके,राजाभाऊ चिलवंत,प्रा.राहुल भिसे,प्रा. दिग्विजय पाटील,उषा पांचाळ, प्रा.प्रतिभा सावंत,अनूप पाटील, धनंजय परजणे,ज्ञानोबा टोपे यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत साध्या पण भावपूर्ण वातावरणात पार पडला. संस्थापकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन