कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात गांधी रिसर्च फाऊंडेशन,जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षा (२०२५–२६) मध्ये महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करत आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रसार व्हावा तसेच नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आली होती.या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून महाविद्यालयातील तब्बल ८६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट गुण प्राप्त केले. या परीक्षेत विशेष कामगिरी करत भराटे पांडुरंग बापूराव (तृतीय वर्ष) यांनी धाराशिव जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळवला,तर गोरे राधा युवराज (बारावी) हिने तृतीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. अशोक मोहेकर,प्राचार्य डॉ. हेमंत भगवान,संचालक डॉ.संजय कांबळे,उपप्राचार्य डॉ.के.डी. जाधव,जयंत भोसले,अधीक्षक हनुमंत जाधव,तसेच प्राध्यापक व मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या परीक्षेचे समन्वयक म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉ.के.डब्ल्यू.पावडे व डॉ.वर्षा सरवदे यांनी मोलाचे योगदान दिले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या या सातत्यपूर्ण यशामुळे परिसरात समाधानाचे वातावरण असून,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाची कटिबद्धता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
More Stories
“आंबेडकर जयंतीनिमित्त करुणेचा उपक्रम;मुक्या प्राण्यांसाठी पाण्याच्या टाक्यांची उभारणी”
गुरु-शिष्य नात्याचा जिवंत आदर्श;परदेश दौऱ्यानंतर गुरुवर्य डॉ.मोहेकर यांचा शिष्याकडून भावपूर्ण सत्कार
आर.एस.पोल्ट्री फार्ममध्ये सदस्यांचा गौरव;रस्ते प्रश्न सोडवण्याचे आश्वासन