धाराशिव–जिल्हा परिषद येथे दि. २४ मार्च २०२६ रोजी अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा डिकसळ ता.कळंब येथील परिसरातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने उत्साहात सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान व्यक्त केला. या कार्यक्रमास कळंब नगर परिषदेचे नगरसेवक प्रशांत लोमटे, डिकसळ ग्रामपंचायत सदस्य इम्रान मुल्ला,जीवा कुचेकर,विशाल शिंदे तसेच जनजागृती शाळेचे ज्येष्ठ सहशिक्षक रफिक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.सर्व उपस्थितांनी अर्चनाताई पाटील यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी डिकसळ गावातील विविध विकासकामांबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली.पायाभूत सुविधा, शिक्षण,पाणीपुरवठा तसेच इतर मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील,असे आश्वासन अर्चनाताई पाटील यांनी दिले.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान