मुंबई – राज्यात गेमिंग,क्रिएटर इकॉनॉमी आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन सक्षम वातावरण निर्माण करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बीकेसी येथील एमएमआरडीए ग्राऊंडवर आयोजित “जेन ओ : पिक्सल अँड प्ले – ग्लोबल ई-स्पोर्ट्स गेम्स”कार्यक्रमात ते बोलत होते. कंटेंट क्रिएटर्ससोबत संवाद साधताना त्यांनी सांगितले की, क्रिएटर्स आणि ब्रँड्स यांच्यातील दरी कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून AVGC धोरणाद्वारे या क्षेत्राला चालना दिली जात आहे.नील मोहन यांच्यासोबत झालेल्या चर्चेचाही त्यांनी उल्लेख केला. विद्यार्थ्यांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT)च्या माध्यमातून प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून,राज्यात 12 AVGC हब्स विकसित केले जाणार आहेत.तसेच नवी मुंबई येथे कंटेंट क्रिएटर्ससाठी अत्याधुनिक कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील इंटरनेट सुविधांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की,सध्या ७० टक्के गावांमध्ये फायबर नेटवर्क पोहोचले असून,पुढील काही वर्षांत सर्व गावांना उच्चगती इंटरनेट उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे.
More Stories
“स्थगिती नसताना शेतकऱ्यांचे पैसे का अडवले?” – २०२० च्या पीकविम्यावर आमदार कैलास पाटील विधानसभेत आक्रमक
१७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा;शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी – कृषी विभागाचे आवाहन
“अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखा विलंब नको; वडू तुळापूर येथील संभाजी महाराज स्मारकाला तातडीने गती द्या” – आमदार कैलास पाटील