March 19, 2026

“गंगाधर करंडकातून कलावंतांना मोठे व्यासपीठ” – विशाल शिंगाडे

  • धाराशिव – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,धाराशिव शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय “गंगाधर करंडक” एकांकिका नाट्य स्पर्धा,नृत्य स्पर्धा व कलावंत मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील नवोदित व होतकरू कलावंतांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे मत कार्यकारिणी सदस्य विशाल शिंगाडे यांनी व्यक्त केले.
    ते पुढे म्हणाले की,“जागतिक रंगभूमी दिनानिमित्त तसेच स्व. गंगाधर शिंगाडे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येणारा ‘गंगाधर करंडक’ हा केवळ स्पर्धा नसून कला जपणारा आणि नव्या प्रतिभेला संधी देणारा सांस्कृतिक उत्सव आहे. यापूर्वीच्या स्पर्धांना राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यंदाही मोठ्या संख्येने नाट्यसंघ सहभागी होतील,असा विश्वास आहे.”
    २७ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे या स्पर्धा पार पडणार आहेत.एकांकिका नाट्य स्पर्धा २७ ते २९ मार्च,नृत्य स्पर्धा ३० व ३१ मार्च,तर १ एप्रिल रोजी कलावंत मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
    विशाल शिंगाडे यांनी आवाहन करताना सांगितले की,
    “जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्व नाट्यप्रेमी,कलाकार, तरुण-तरुणींनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कलेचे सादरीकरण करावे. आयोजकांच्या वतीने स्पर्धकांसाठी निवास व भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.त्यामुळे ही सुवर्णसंधी सर्वांनी साधावी.”
    या स्पर्धांमुळे धाराशिवमध्ये सांस्कृतिक वातावरण अधिक बहरणार असून,रसिकांसाठी ही एक अनोखी कलामेळा ठरणार आहे.
error: Content is protected !!