March 18, 2026

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे नियोजन;कार्यकारिणी जाहीर

  • कळंब – सम्राट अशोक नगर, डिकसळ ता.कळंब येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त उत्सवाचे भव्य नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक संजय वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
    बैठकीची प्रस्तावना ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत कदम यांनी करत जयंती उत्सवाचे सामाजिक व शैक्षणिक महत्त्व अधोरेखित केले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविणे,विद्युत रोशनाई, आकर्षक देखावे सादर करणे तसेच ध्वजारोहण कार्यक्रम भव्य पद्धतीने आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
    उत्सव यशस्वी करण्यासाठी कार्यकारिणीची निवडही करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी आकाश भालेराव,उपाध्यक्षपदी स्वप्निल बरकसे व राहुल सावंत, सचिवपदी बिरसा उबाळे व अनिकेत भालेराव,तर कोषाध्यक्षपदी रोहित पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
    बैठकीदरम्यान ज्येष्ठ साहित्यिक के.व्ही.सरवदे व ज्येष्ठ कवी रमेश जगताप यांनी मार्गदर्शन करत जयंती उत्सव अधिक प्रभावी व प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सावंत यांनी केले,तर आभार प्रदर्शन सागर भालेराव यांनी मानले.बैठकीस परिसरातील नागरिक, युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!